Home क्राईम साक्ष न देण्यासाठी धमकावणार्‍याला अटक करा : माजी नगरसेविकेची मागणी

साक्ष न देण्यासाठी धमकावणार्‍याला अटक करा : माजी नगरसेविकेची मागणी

0
107

जळगाव प्रतिनिधी | रमेश तोताराम सोनवणे यांच्या खून खटल्यातील प्रमुख साक्षीदार असणार्‍या त्यांच्या पुतण्याला धमकावणार्‍याला अटक करावी अशी मागणी माजी नगरसेविका लिलाबाई रमेश सोनवणे यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की,सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश तोताराम सोनवणे यांचा २००८ साली खून करण्यात आला होता. त्यांच्या खुनाचा न्यायालयात खटला सुरू असून यात त्यांचे पुतणे अनिल मोतीराम सोनवणे हे मुख्य साक्षीदार आहेत. या हत्या प्रकरणातील संशयित भूषण सोनवणे यांनी अनिल सोनवणे यांना कोर्टात साक्ष देण्यासाठी जाऊ नको यासाठी धमकावले आहे. ही धमकी देऊन तो पसार झालेला आहे.

दरम्यान, दिवंगत रमेश सोनवणे यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका लिलाबाई रमेश सोनवणे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले. यात भूषण सोनवणे हा धमकी देऊन फरार झाला असल्याने पोलिसांनी त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी अपेक्षा देखील यात व्यक्त करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound