

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव विमानतळाचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना, प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. वीर सावरकर रिक्षा युनियनच्या पुढाकाराने जळगाव विमानतळ रिक्षा थांबा कुसुंबा येथे उभारण्यात आला असून, त्याचा उद्घाटन सोहळा 12 ऑक्टोबर 2025 रोजी उत्साहात पार पडला.
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे लोकप्रिय आमदार राजू मामा भोळे हे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी गोसेवाव्रती, पृथ्वी बचाव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व कायदेतज्ज्ञ ॲड. विजय काबरा यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. रिक्षा थांब्याच्या निर्मितीसाठी वाल्मिक सपकाळे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जळगाव विमानतळावरून विमान उड्डाणांचे वेळापत्रक झपाट्याने वाढत असून, प्रवाशांची संख्या देखील लक्षणीयरीत्या वाढत आहे. जळगाव शहर ते विमानतळाचे अंतर मोठे असल्याने अनेक प्रवाशांना रात्रीच्या वेळेस विशेषतः गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही गरज ओळखून वीर सावरकर रिक्षा युनियनने या ठिकाणी थांब्याचे नियोजन केले, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमास स्वामी राजेश्वरानंद सरस्वती, विमान पत्तन अधिकारी हर्षल त्रिपाठी, निर्मल बारा, एमएसएफचे इन्चार्ज श्री. शेख हे मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी थांबा अध्यक्ष श्री. शांताराम पाटील, उपाध्यक्ष देविदास पाटील आणि सदस्य रामदास पाटील, अरुण पाटील, हर्षल राजपूत, सागर सोनवणे, सूरज राजपूत, राहुल पाटील, शिवाजी पाटील, रवींद्र कोळी, अभिजित बाविस्कर, अजय पाटील यांचे विशेष योगदान होते.
तसेच, कुसुंबा गावातील ग्रामस्थ विलास बाविस्कर, राधेश्याम चौधरी, धनराज पाटील, कुलकर्णी अप्पा आदी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास पाठिंबा दर्शवला.



