जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ऑनलाईन परिक्षेसाठी तब्बल पाच कोटी रूपये अदा करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विद्यापीठ कृती समितीने केली आहे. दरम्यान, डॉ. भादलीकर यांची बेकायदेशीर पध्दतीत प्रभारी कुलसचिवपदी केलेली नियुक्ती रद्द करावी या मागणीसाठी आज कर्मचार्यांनी दुसर्या दिवशी देखील काम बंद आंदोलन केले. या प्रकरणाकडे प्रभारी कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन हे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप देखील कृती समितीने केला आहे.
येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेचे बील रुपये पाच कोटी पर्यंत आलेले असल्याने सदर बीलाबाबत प्रसार माध्यमात उलट सुटल बातम्या येवूनही याची अद्यापपावेतो कुठलीहीचौकशी झालेली नाही. तसेच विद्यापीठाने देखील याची गांभिर्याने नोंद घेतलेली नाही. असे असतांना करोडो रुपयांचीबेकायदेशीर बिले मंजुर करुन घेवून अदायगी करण्यात येत आहे. सदरची बाब अतिशय गंभिर असून, विद्यापीठाची आर्थिकस्थिती कमकुवत होत आहे. या बेकायदा बीलाची चौकशी न झाल्यास पर्यायाने विद्यापीठातील कर्मचार्यांचे भविष्यातवेतनदेखील यापुढे वेळेवर होणार नाही, अशी भयावह परिस्थिती उदभवणार आहे. तरी अशा प्रकारचे गैर व्यवहार होतअसलेल्या बीलांची शासनामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी कृति समितीने केली आहे. आज याबाबत निवेदन जारी करण्यात आलेले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठातील एका वरिष्ठ प्राध्यापकाने नियमानुसार विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.ई.वायुनंदन यांचेकडे रितसर अर्ज करुन प्र.कुलगुरु पदावर काम करण्याची सधी द्यावी अशी विनंती केली होती. कारण प्र.कुलगुरु पद जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत एका व्यक्तीकडे सोपवता येते. प्र.कुलगुरु पदावर सदरच्या व्यक्तीला सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला गेल्यामुळे त्यांनी तसा अर्ज दिलेला होता. सदरचा अर्ज प्रभारी कुलगुरु डॉ.ई.वायुनंदन यांनी तेव्हा विद्यापीठाचे कायदा अधिकारी भादलीकर यांच्याकडे कायदेशीर अभिप्रायासाठी पाठविला असता, कायदा अधिकारी यांनी सदर अर्जाच्या अनुषंगोने प्र.कुलगुरु डॉ.बी.व्ही.पवार यांच्याशी संगणमत करुन प्र.कुलसचिव पद नियम बाह्य रित्या पात्रता नसतांना भादलीकर यांच्याकडे सोपवून दोघांची वर्णी लावून घेतली असल्याची चर्चा सुरु आहे. अशा प्रकारचे अनेक नियमबाहय कामे सध्या प्रभारी राजवटीत विद्यापीठात सुरु आहेत.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आज विद्यापीठ कर्मचार्यांचा लेखणी बंद आंदोलनाचा दुसरा दिवस असून, सदर दिवशी कर्मचार्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे. वास्तविक प्रभारी कुलगुरु वायु नंदन हे विद्यापीठात नसतांना त्यांच्या ऐवजी प्र.कुलगुरु डॉ. बी. व्ही.पवार यांनी विद्यापीठातील कर्मचार्यांचे आंदोलन चर्चेव्दारे सोडवणे आवश्यक होते. त्यासाठी काल दि.४/१०/२०२१ रोजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्यांनी मध्यस्थी करुन प्र.कुलगुरुं डॉ.बी.व्ही.पवार यांच्या समवेत झालेल्या चर्चे अंती प्रभारी कुलगुरु डॉ.ई.वायुनंदन यांच्याशी चर्चा करुन आपणास निर्णय देता असे कृति समितीस आश्वासन दिले होते. तथापि, अद्यापपावेतो भादलीकर यांना प्र.कुलसचिव पदावरुन हटवलेले नाही.
विद्यापीठातील समस्त कर्मचारी विद्यापीठातील बेकायदेशीरपणे नियुक्त केलेले प्र.कुलसचिव डॉ.भादलीकर यांच्याराजीनाम्यावर ठाम असून, जो पर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे कृतिसमितीचे ठाम मत असून, विद्यापीठ प्रशासनाला याबाबतची जाणीव करुन दिलेली आहे. आजसंध्याकाळपर्यंत भादलीकर यांना बेकायदा नियुक्त केलेल्या प्र.कुलसचिव पदावरुन न हटविल्यास आंदोलन अधिक तीव्रकरण्यात येईल. व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असे विद्यापीठ कृतिसमितीने कळविले आहे. या निवेदनावर
या निवेदावर विद्यापीठ कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, सचिव भैय्यासाहेब पाटील, कार्याध्यक्ष महेश पाटील, समन्वयक जगदीश सुरळकर आणि समन्वयक दुर्योधन साळुंखे यांच्या स्वाक्षर्या आहेत.