व्यापार्‍याला लुटले : आठ लाखांची पिशवी घेऊन चोरटे फरार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सिंधी कॉलनीतील रहिवासी असलेल्या व्यापार्‍याची आठ लाख रूपयांनी भरलेली थैली घेऊन दोन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शहरात रात्री घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, सिंधी कॉलनीत राहणारे ईश्वर मेघाणी यांचे दाणा बाजारात दुकान आहे. दररोजचे काम आटोपून ते रात्री साडेनऊच्या सुमारास घरी निघाले होते. त्यांच्या सोबत असलेल्या बॅगेत आठ लाख रूपयांची रोकड, मोबाईल व लॅपटॉप ठेवलेला होता. पांडे डेअरी चौकातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ दोन तरूणांनी त्यांच्या दुचाकीला लावलेली पिशवी हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. त्यांनी तात्काळ आरडा-ओरडा केल्याने एका तरूणाने त्यांचा पाठलाग केला. मात्र ते भरधाव वेगाने नेरी नाक्याकडून पुढे पसार झाले. मेघाणी यांना लुटणारे तीन चोरटे असून ते दोन दुचाकींवरून आले असल्याचे दिसून आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह एलसीबीचे प्रमुख ज्येष्ठ निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content