रावेर प्रतिनिधी । जखमी मोरावर वेळेत उपचार केल्याने त्याला वनविभागाच्या वनपालामुळे जिवनदान मिळाले आहे. ही घटना रावेर तालुक्यातील आभोडा जंगलात घडली आहे. यामुळे पक्षीप्रेमीं मधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
आभोडा गावाच्या जंगलात गट नं 15 मध्ये जखमी अवस्थेत राष्ट्रीय पक्षी मोर जखमी आवस्थेत आढळला. येथील शेतकरी देवीसिंग पवार याला हा जखमी मोर दिसताच त्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला. वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच वनपाल अतुल तायडे, सहकारी हरीष थोरात यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मोराच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला इजा झाली होती. लगेच त्या मोराला रावेर येथे आणून त्याच्यावर पशुवैद्यकिय अधिकारी किशोर भंगाळे यांनी उपचार केले. सद्या मोर वनविभागाच्या ताब्यात असून त्याच्यावर उपचार करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थ वसंत पवार, रामसिंग राठोर, रेहमत तडवी, शरीफ तडवी आदी सहकार्य केले.