जयपूर बॉम्बस्फोट प्रकरण: चार दोषींना फाशीची शिक्षा; एकाची सुटका

0court 383

जयपूर वृत्तसंस्था । जयपूर येथे मे २००८ मध्ये झालेल्या नऊ बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या चौघांना भारतीय दंडविधान संहितेतील वेगवेगळ्या कलमांखाली दोषी ठरविण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने एकाची निर्दोष सुटका केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद सैफ (वय-३२), मोहम्मद सरवार (वय-३६), सैफ उर रेहमान (वय-३६) आणि सलमान (वय-३४) यांना न्यायालयाने दोषी ठरविले होते. खून, खुनाचा प्रयत्न, धोकादायक तीक्ष्ण शस्त्रांचा वापर करून जखमी करणे, कट रचणे, बेकायदा कृत्ये या सर्व कलमांखाली न्यायालयाने या चौघांना दोषी ठरविले होते. आरोपींनी १३ मे २००८ जयपूरमध्ये सायकलवर नऊ बॉम्ब ठेवले होते. संध्याकाळी ७.२० ते ७.४५ या २५ मिनिटांच्या कालावधीत या सर्व बॉम्बचा स्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये ७१ लोक मृत्युमुखी पडले होते.

जयपूर येथे झालेल्या या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. या संघटनेच्या वतीने मेल पाठविण्याचे काम शाहबाज हुसेन ऊर्फ शाहबाज अहमद ऊर्फ शानू याने केले होते. त्याची न्यायालयाने सुटका केली. या बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी सर्वात आधी त्याला अटक केली होती. तो बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना स्टूडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा सदस्य होता.

Protected Content