Home Cities जळगाव जागतिक शाकाहार दिनानिमित्त जिल्ह्यात मांस विक्री बंद ठेवा; जैन बांधवांची मागणी

जागतिक शाकाहार दिनानिमित्त जिल्ह्यात मांस विक्री बंद ठेवा; जैन बांधवांची मागणी

0
142


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । । जागतिक शाकाहार दिनाचे औचित्य साधून १ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यात उघड्यावर चालणारी मांस विक्रीची दुकाने आणि कत्तलखाने पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी श्री जैन युवा फाऊंडेशनने प्रशासनाकडे केली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.

१ ऑक्टोबर हा दिवस जगभर शाकाहाराचे महत्त्व आणि प्राणी कल्याणाचा संदेश देण्यासाठी ‘जागतिक शाकाहार दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे पावित्र्य राखले जावे आणि शाकाहाराला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने फाऊंडेशनने ही मागणी केली आहे.

निवेदन सादर करताना फाऊंडेशनचे अध्यक्ष रितेश कटारिया, सचिव ऋषभ शाह, कोषाध्यक्ष पंकज सुराणा, उपाध्यक्ष विनय गांधी, कार्याध्यक्ष अंकित जैन यांच्यासह अनेक जैन बांधव उपस्थित होते. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, तात्काळ या मागणीचा विचार करून आवश्यक आदेश जारी करावेत अशी विनंती केली आ


Protected Content

Play sound