जबरी लुटप्रकरणातील अट्टल गुन्हेगारास मध्यप्रदेशातून अटक

parola news 2

जळगाव प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ अज्ञात पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी महामार्गावर ट्रक आडवून चालकास मारहाण करून रोख रक्कम लंपास घटना घडली होती. या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातून अटक करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, 8 जून 2012 रोजी पहाटे 3.30 ते 4 वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील विचखेडा जवळील महामार्गावर अज्ञात पाच ते सहा हल्लेखोरांनी महामार्गावरून जाणारा ट्रक क्रमांक एमएच 05 के 8814 बंदूकीचा धाक दाखवून जबरी थांबवून चालक व क्लिनर यांना लाथा बुक्यांनी मारझोड करून व बंदुकीने गोळीबार करून त्यांचे खिशातील ताब्यातील 26 हजार 850 रूपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली होती. याप्रकरणी पोराळा पोलीसात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या ८ वर्षापासून पाहिजे आरोपी साबीर उर्फ मोनू युसुफ मुसलमान (वय ३०) रा. बिजली ऑफिस जवळ चिंचोली रोड, मुंडी ता. पूनासा, जिल्हा खंडवा मध्यप्रदेश हा मुंडी शहरात असल्याची गोपनीय माहीती पोहेकॉ. रवींद्र पाटील यांना मिळाली होती.

यांनी केली कारवाई
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री.बापु रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, दादाभाऊ पाटील, दीपक पाटील, पोहेकॉ इद्रिस पठाण, प्रकाश महाजन, गफुर तडवी, वैशाली महाजन यांनी मुंडी शहरात दोन ठिकाणी सापाला लावून साबीर उर्फ मोनू युसुफ मुसलमान यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामी पारोळा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

Protected Content