फैजपूर प्रतिनिधी । येथील जे. टी. महाजन इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये (दि. 21 जून) रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जे टी महाजन इंग्लिश मेडिअम स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यास अनुसरून (दि. 21 जून) रोजी आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात ६०४ विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायाम केलेत. योगाभ्यास करतांना उपशिक्षक अतुल गोराडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वतः प्रात्याक्षिक करत आसने व प्राणायाम यांचे लाभ विषद केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्रा. मोझेस जाधव, पर्यवेक्षिका पुनम नेहेते, विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व योगादिनाचे महत्व आणि पार्श्वभूमी उपशिक्षिका मनीषा जावळे यांनी विषद केले.