मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जे. ई. स्कूल आणि ज्यू. कॉलेज मुक्ताईनगर येथे दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राचार्य एन. पी. भोंबे यांचे हस्ते आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या उपस्थितीत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.
गेल्या चार दिवसांपासून वेग वेगळ्या प्रकारे उपक्रम घेवून मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात आला. आजच्या पाचव्या दिवशी विद्यालयातील शिक्षक एस. आर. ठाकूर यांनी श्री गणेश स्तोत्र पठण घेवून मुलांना त्याचे महत्व सांगितले. एस. एम. वाढे आणि एस. जे. मोरे यांनी तयार केलेले लेझीम पथक व ढोल ताशा वादक पथक यांचे मदतीने भव्य विसर्जन मिरवणूक काढून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रसंगी प्राचार्य,पर्यवेक्षक तथा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू भगिनीनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देवून विसर्जन करण्यात आले.