छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील झोडेगाव शिवारात धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन भावंडांचे मृतदेह विहिरीत रविवारी सायंकाळी ६.३० वाजता आढळून आले आहे. शुभम संतोष ताकवाले, अमृता संतोष ताकवाले, शिवानी संतोष ताकवाले अशी मृत भावडांची नावे आहेत. वडिलांनीच या तिन्ही भावंडांना विहिरीत ढकलून मारल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेतील संशयित संतोष ताकवाले हा डोमेगाव येथील रहिवासी आहे. पोलिसांना माहिती मिळताच विहिरीतून मृतदेह बाहेर काढून अंबड येथील रुग्णालयात आणले. मुलांना पित्याने विहिरीत का ढकलले याबाबतचा तपास सुरु आहे. विशेष म्हणजे संशयिताने या घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर तो मुंबईला पळून जात होता. त्याला संभाजीनगरात पोलिसांनी रात्री ११ वाजता अटक केली. घटनेला कौटुंबिक वादाचीकिनार आहे.
कौटुंबिक वादातून वडिलानेच तिन्हीमुलांना विहिरीत ढकलून देत त्यांचाखून केला आहे. घटनेनंतर संशयितपसार झाला होता , लागलीचपोलिस पथक त्याच्या मागावर होते, अशी माहिती अंबड ठाण्याचेपोलिस निरीक्षक रघुनाथ नाचणयांनी दिली. या घटनेत आणखीकुणाचा सहभाग आहे, याचाही पोलिस शोध घेत आहेत. संशयिताचे शेवटचे मोबाइललोकेशन आणि सध्याचे लोकेशनया आधारे पोलिस त्याचा शोध घेतहोते. संशयित वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याचे तपासातसमोर आले आहे. संभाजीनगरातील जालना रोडवरील बाबा पेट्रोल पंपपरिसरातून त्याला ताब्यात घेतले. तो मुंबईला जाण्याच्या बेतात होता, असे निरीक्षक नाचण म्हणाले.