भुसावळातील ‘त्या’ डॉक्टरांचे हॉस्पीटल्स बंद; कारवाई गुलदस्त्यात

0

भुसावळ प्रतिनिधी । येथील डॉ. जयंत धांडे व डॉ. स्वप्नील कोळंबे यांच्याकडे आयकर खात्याने छापा टाकल्यानंतर दोन्ही हॉस्पीटल्स आज बंद होते. तर आयकर खात्याने कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याबाबत वृत्तांत असा की, डॉ. जयंत धांडे व डॉ. स्वप्नील कोळंबे यांच्या हॉस्पीटल्समध्ये आयकर खात्याच्या नाशिक विभागाच्या पथकाने दि. १२ रोजी सायंकाळी कारवाई केली. नेमकी काय काय कारवाई झाली व काय घबाळ बाहेर आले याबाबत माहिती कळू शकली नाही. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई करण्यात आली. पांडुरंग टॉकीज जवळील धांडे हॉस्पिटलचे डॉ. जयंत धांडे व जामनेर रोडवरील इंडियन पेट्रोल पंपा शेजारील डॉ. स्वप्निल कोळंबे यांच्या दवाखान्यात आयकर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कारवाईत नेमके काय आढळून आले. याबाबतही माहिती कळू शकली नाही. दरम्यान, आज दिवसभर हे दोन्ही हॉस्पीटल्स बंद असल्याने कारवाईबाबत तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!