भुसावळ (प्रतिनिधी) येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील गजानन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर, सिव्हिल, मेकॅनिकल या विद्या शाखांतील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. आज (दि.१४) लहान मुलांची खेळणी बनवणाऱ्या ‘फन स्कूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या मल्टि नॅशनल कंपनीतर्फे ४७ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ४० विद्यार्थ्यांना आकर्षक पगाराच्या नोकऱ्याही देण्यात आल्या आहेत.
महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाने यावर्षी महत्त्वाची भूमिका बजावून सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही महाविद्यालयात प्रवेश घेतलेला एकही विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहू नये, यासाठी काही बहुराष्ट्रीय कंपन्यांशी आम्ही करार करणार आहोत. यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले. आजच्या मुलाखतीतून वार्षिक १० लाख उत्पन्नापासून २.५ वार्षिक उत्पन्नाच्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत.
२०१७-१८ व २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींतून एकूण १५५ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली आहे. मोठ्या पदावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले पॅकेज मिळणार आहे. सोबत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासही त्यांना मदत होणार आहे. यावर्षी इन्फोसिस, टेलेपरफॉर्मन्स, वेबविंग टेक्नॉलॉजी, धूत ट्रान्समिशन, फनस्कूल इंडिया, डॉलर ऍडव्हाईसरी, आयआयएचटी, आयएसटीसी, डेक्सल, बायजुस, अजंता फार्मा अश्या भारतातील नामांकित कंपन्यांनी येथील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा.आय.डी. पॉल, प्रा.निलेश वाणी, प्रा.मनोज बडगुजर यांनी यासाठी परिश्रम घेतले.