लतादीदींच्या करियरची सुरवात पाचोऱ्यातून झाली ही अभिमानाची गोष्ट – सचिन सोमवंशी (व्हिडीओ)

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गानसम्राज्ञी भारतरत्न, स्व.लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीला पाचोऱ्यापासून सुरुवात झाली ही खान्देश वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या जाण्याने संगीतातील एक पर्व संपले असून त्यांचा स्वर अजरामर राहतील अशा भावना व्यक्त करत सचिन सोमवंशी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.

देशाने ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन ज्यांचा सन्मान दिला त्या गानसम्राज्ञी लतादीदींना आपल्या संपूर्ण देशावर राज्य केले. ज्या गाण्यामुळे त्यांनी हे यश मिळवले त्या गाण्याच्या करीयरची सुरवात जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा शहरातून केली आहे. मंगेशकर कुटुंबाची त्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट होती म्हणून गावागावात जाऊन आपली कला सादर करीत होते. १९३५ च्या दरम्यान लतादीदींचे वडील स्व. दिनानाथ मंगेशकर यांच्या बरोबर ‘संगीत सौभद्र’ नाटकाच्या निमित्ताने पाचोरा शहरात आले असता नाटकाच्या शो रात्री होता. मात्र त्यावेळी नाटकातील नारदाची भुमिका साकारणारे कलाकार आजारी पडले. आणि याच दिवशी रात्रीचा शो असल्यामुळे ऐनवेळी या भूमिकेसाठी कोणाला सांगावं हा प्रश्न दिनानाथ मंगेशकर यांना पडला. तेव्हा ‘लतादीदींनी त्यांना “नारदाचे माझे सर्व संवाद पाठ आहेत; मी नारद होवू का?’ असे विचारले

दिनानाथ मंगेशकर काही क्षण विचारात पडले, ‘अर्जुन मोठा आणि नारद लहान…’ पण दुसरा पर्याय नसल्याने शेवटी लतादीदींना नारदाची भूमिका करायला लागली अशारीतीनी लतादीदींचा रंगमंचावर प्रेक्षकांसमोर गाण्याचा पहिला योग पाचोरा शहरात आला. यात लतादिदी यांनी गायिलेल्या आण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘पावना वामना या मना’ नाट्यपदाला वन्समोरदेखील मिळाला. ही आठवण आपल्या तरुण पणातील एका मुलाखतीत त्यांनी सांगितली आहे.

सदर व्हिडीओ पाचोरासाठी अभिमानाचा विषय असल्याने तो कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी संग्रही ठेवला आहे. लतादीदींच्या जीवनातील पहीलीच संधी पाचोरेकरांनी दिली याचा अभिमान वाटतो आणि त्यांनीच तो सांगितला. हा लतादीदी यांच्या मनांचा मोठेपणा. त्यांचे आजोळही खान्देशातील थाळनेरचे हे आहे. त्यांच्या जाण्याने संगीतातील एक पर्व संपले असून त्यांचा आवाज अजरामर राहील. अशा भावना व्यक्त करत सचिन सोमवंशी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.

व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/474839514031068

 

Protected Content