नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इस्त्रोने आपल्या ऐतिहासिक गगनयान मिशन नुकतीच घोषण केली आहे. हे मिशनमध्ये चार अंतराळवीरांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या चारही अंतराळवीरांना एस्ट्रोनॉट विंग्स घातले आणि त्यांचा गौरव केला. या अंतराळवीरामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला अशी त्यांची नावे आहेत. या चौघांनी प्रत्येक प्रकारच फायटर जेट उडवलं आहे.
हे चौघेही इंडियन एअर फोर्सचे टेस्ट पायलट्स आहेत. म्हणूनच या चौघांना गगनयान अंतराळावीर ट्रेनिंगसाठी निवडण्यात आला. सध्या बंगळुरुत अंतराळवीर केंद्रात चौघांचे प्रशिक्षण सुरु आहे. त्यांची निवड इंस्टीट्यूट ऑफ एयरोस्पेस मेडिसिनमध्ये झाली आहे. अनेक राऊंड पूर्ण करून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंरत इस्त्रोने चौघांची नावे निश्चित केली आहेत.