आयपीएल खेळाडूंचा येत्या १९ डिसेंबर रोजी लिलाव

ipl nilav

मुंबई प्रतिनिधी । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेसाठी येत्या १९ डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. कोलकाता येथे हा लिलाव होणार असल्याचे आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने सांगितले आहे. दरवर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी पहिल्यांदाच कोलकात्यात लिलाव होणार आहे.

आज आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पार पडली. त्यात १९ डिसेंबरपासून आयपीएल खेळाडूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आधी आयपीएल खेळाडूंचा लिलाव बेंगळुरूमध्ये केला जायचा. २०१९मध्ये प्रत्येक फ्रँचाइजला ८२ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं होतं. २०२०मध्ये ही रक्कम वाढून ८५ कोटी एवढी झाली आहे. या शिवाय अतिरिक्त तीन कोटी आयपीएलच्या प्रत्येक संघाजवळ असणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे ७.७ कोटी, राजस्थान रॉयल्सकडे ७.१५ कोटी आणि केकेआरकडे ६.०५ कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या आयपीएल स्पर्धेपूर्वी लसित मलिंगा, ब्रॅडन मॅक्लम, सॅम क्युरेन, कॉरेन अॅण्डरसन, कॉलिन इनग्राम, शॉन मार्श, अँजेलो मॅथ्यू, डार्सी शॉर्ट आणि ख्रिस वोक्स या खेळाडूंना सर्वाधिक मागणी होती. यंदा आयपीएलच्या मोसमात कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Protected Content