कोलकाता वृत्तसंस्था । आयपीएलच्या आगामी १३व्या हंगामासाठी कोलकाता येथे लिलाव प्रक्रियाला सुरूवात झाली आहे.
या लिलावासाठी एकूण ९७१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून अखेर ३३२ खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानंतर गुरूवारी सकाळी आणखी ६ खेळाडूंना या यादीत समाविष्ट करण्यात आले. या खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान आठ संघांना आपला चमू पूर्ण करण्यासाठी एकूण ७३ खेळाडू हवे आहेत. त्यापैकी २९ खेळाडू हे परदेशी असणार आहेत. यंदा लिलावामध्ये पंजाब संघाकडे सर्वाधिक ४२.७० कोटी तर मुंबई संघाकडे सर्वात कमी म्हणजे १३.०५ कोटी इतकी रक्कम आहे.