यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास वेग आला असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. रावेर यावल विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची चौकशी करण्यात येत आहे.
रावेर यावल विधानसभा निवडणुकीतील भाजया, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षाच्या महायुतीचे उमेदवार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या निवडणुक प्रचारासाठी १० नोव्हेंबर रोजी फैजपुर तालुका यावल येथे जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर यावल पोलीस ठाण्याचे सपोनि सोपान गोरे, पोलीस कर्मचारी तथा केंद्रीय सुरक्षा बल या यंत्रणेच्या वतीने भुसावळ टी पॉईंट यावलसह तालुक्यातील ईतर महत्वाच्या ठिकाणी नाकेबंदी करण्यात येवून चारचाकी वाहनांची कसुन चौकशी करण्यात आली.