‘ त्या’ शासन निर्णयांची चौकशी करा : भाजपची मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे सरकार अस्थिर झाले असतांनाच मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात निघणारे जीआर हे संशयास्पद असून याची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे.

 

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज राज्यपालांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्याने घाईघाईत शासन आदेश जारी करत असून यासंदर्भात संशय घेण्यास वाव आहे. ज्या वेगाने शासन आदेश जारी केले जात आहेत ते पाहता यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं अशी मागणी यात करण्यात आलेली आहे.

 

 

या पत्रात पुढे नमूद केले आहे की, राज्यातील राजकीय स्थिती तीन दिवसांमध्ये अत्यंत अस्थिरतेची झाली आहे. दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारने १६० हून अधिक शासन आदेश काढलेले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली काढलेले जीआर संशय वाढवणार आहेत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Protected Content