चोपडा, प्रतिनिधी । बेलापूर- श्रीरामपूर येथील व्यापारी स्व.गौतम हिरण यांचे दुकानाजवळून अपहरण झाल्यानंतर काही दिवसानंतर खुन् करण्यात आला तसेच स्व. मनसुख हिरेन यांच्या मृतदेह मुब्राच्या खाडीत संशयास्पद सापडला ह्या दोन्ही खुनाचा सखोल चौकशी होऊन आरोपीतांनावर कडक कारवाई व्हावी याबाबत खान्देश विभागातील सर्व जैन पत्रकारांनी शिरपूर येथील प्रांताधिकारीना निवेदन देण्यात आले.
सविस्तर असे की, स्व.गौतम हिरेन यांचे अपहरण झाल्यावर पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी दिरंगाई केल्यामुळेच गौतम हिरणचा दि ७ मार्च रोजी खून झाला. पोलिसांनी मारेकऱ्यांना व अपहरणकर्त्यांना पकडले असले तरी त्यांची सखोल चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी. जेणेकरून अश्या अपहरणच्या घटना वारंवार होणार नाही याला आळा बसू शकतो. तसेच स्व. मनसुख हिरेन ह्याचा देखील मृतदेह मुब्राच्या खाडीत संशयास्पद सापडला ह्या दोन्ही घटनाने जैन समाजाला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही खुनाचे कारण काय असावे ? यांची सखोल चौकशी होऊन हिरण परिवाराला व संपूर्ण जैन समाजला न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा जैन समाजाकडून होत आहे. अहिंसा प्रिय समाजाला असा त्रास सहन करावा लागतो तर या पेक्षा दुर्दैव काय असू शकते? अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया जैन समाजातून उमटतं आहे. काळिमा फासणारी घटना असल्याने आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी विक्रांत बांदल यांना देण्यात आले. यावेळी खान्देशातील संपूर्ण जैन पत्रकार विजय बाफना, राजकुमार जैन, तुषार बाफना, महेंद्र भंडारी, सतीश चोरडीया, दिलीप बोरा, ललित जैन, गणेश जैन, चंद्रकांत डागा, जोशीला पगारिया, राजमल जैन, अभय लोढा, विनय जैन, आदीच्या स्वाक्षरी होत्या.