भुसावळात लेवा पाटीदार समाजाचा परिचय मेळावा उत्साहात

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील संतोषी माता सभागृहात अखील भारतीय लेवा पाटीदार महासंघातर्फे आज वधू-वर परिचय मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.

या परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लेवा पाटीदार समाजाचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल वारके, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, आशाताई कोल्हे, भोरगाव लेवा पंचायत सदस्य सुधीर गंगाधर पाटील,डॉ.बाळू पाटील, अशोक चौधरी, यादवराव बर्‍हाटे,आरती चौधरी,मंगला पाटील,स्वाती भोळे,नीला चौधरी, योगेश इंगळे, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे संस्थापक आणि केंद्रीय अध्यक्ष प्रकाशराव पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष राजेश चौधरी, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र वाणी, वासुदेव इंगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी देशभरातून आलेल्या वधू आणि वरांनी आपापला परिचय करून दिला. मान्यवरांनी आपल्या भाषणातून सुखी संसाराची सूत्रे नमूद केली. खासदार रक्षाताई खडसे यांनी शेतकरी मुलांना देखील मुलींनी प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. तर आमदार संजय सावकारे यांनी व्यापार करणार्‍यांना प्राधान्य द्यावे असे सांगितले. कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी कौटुंबिक कलह कमी करण्यासाठी पालकमांनी मुलीच्या घरात कमी हस्तक्षेप करावा असा सल्ला दिला.

या कार्यक्रमात वधू-वर परिचय पुस्तीकेचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. यशस्वीतेसाठी अखील भारतीय लेवा पाटीदार महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Protected Content