जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जळगाव जिह्यात पोलीस विभागात काही अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत प्रशासकीय पदस्थापना व बदल्या करण्यात आल्या आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण १५ अधिकारी बाहेरील जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात येत येत आहे असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी काढले.
यात अहमदनगर येथून पोनि. मधुकर साळवे यांची प्रभारी चोपडा शहर पोलीस स्थानकाला तर नाशिक ग्रामीण येथील पोनि.विकास देवरे अमळनेर पोलीस स्थानकाला, पोनि.सुनील पाटील भडगाव पोलीस स्थानकाला, पोनि.संदीप रणदिवे रामानंदनगर पोलीस स्थानकाला, भुसावळ बाजार पेठचे पोनि.बबन आव्हाड यांची प्रभारी एमआयडीसी पोलीस स्थानकाला, भुसावळ शहर पोलीस स्थानकाचे सपोनि. संतोष चव्हाण प्रभारी अडावद पोलीस स्थानकाला, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.निलेश राजपूत यांची प्रभारी कासोदा पोलीस स्थानकाला, नाशिक ग्रामीण येथून सपोनि.प्रकाश काळे हे प्रभारी पिंपळगाव हरे. पोलीस स्थानकाला, पिंपळगाव हरे. येथील सपोनि.महेद्र वाघमारे, एमआयडीसी पोलीस स्थानकाला, धुळे येथून सपोनि.गणेश फड यांची नियंत्रण कक्षात, अहमदनगर येथून सपोनि.तेजश्री पाचपुते नियंत्रण कक्षात, नाशिक ग्रामीण येथून सपोनि.कल्याणी वर्मा यांची जळगाव शहर पोलीस स्थानकाला, नाशिक ग्रामीण येथून पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांची निंभोरा पोलीस स्थानकाला, अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची देखील नियंत्रण कक्षात आले असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी आदेश काढले आहेत.