Home Cities जळगाव महिला व बालविकास विभागातर्फे पाच जानेवारी रोजी मुलाखती

महिला व बालविकास विभागातर्फे पाच जानेवारी रोजी मुलाखती

0
55

जळगाव प्रतिनिधी | मुलांचे व मुलींचे बालगृह/ निरीक्षणगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरतीकरीता पात्र उमेदवारांची अंतिम यादी ही प्रशासनाच्या www.Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली असून त्यांच्या मुलाखती बुधवार, दि. ५ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणार आहे.

जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे व मुलींचे बालगृह/ निरीक्षणगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरतीकरीता उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांची निवड करुन अध्यक्ष, निवड समिती तथा जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार प्राप्त झालेल्या उमेदवारांमधून निवड झालेल्या उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी यापूर्वी प्रसिध्द करून हरकती मागविण्यात आलेल्या होत्या, प्राप्त हरकतींनुसार यादी दुरुस्ती करुन दुरुस्त यादी व मुलाखतीस पात्र उमेदवारांची अंतिम यादी ही जिल्हा प्रशासनाच्या www.Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील दर्शनीय भागात देखील 27 डिसेंबर 2021 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे.

संबंधित पात्र उमेदवारांच्या मुलाखती ५ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणार असून पात्र उमेदवारांना मुलाखत पत्र त्यांच्या अर्जात नमूद ई- मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे. सदर मेल प्राप्त न झाल्यास संबधितांना या कार्यालयास संपर्क साधावा. सदर भरती प्रक्रिया ही प्राप्त गुणांकनाच्या आधारे व पारदर्शक पध्दतीने पार पडणार असून कुणीही कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असे. असा प्रकार निदर्शनास आल्यास संबधितांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव, दूरध्वनी क्रमांक ०२५७– २२२८८२८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.


Protected Content

Play sound