दहा हजार ‘गांधीदूतां’च्या माध्यमातून भाजपला मिळेल चोख उत्तर – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई वृत्तसंस्था | भाजपकडून समाजात खोटी माहिती पसरवली जात असल्याचे सांगत याला प्रतिबंध घालत प्रत्युत्तर देण्यासाठी आणि लोकांपर्यंत खरी माहिती पोहचविण्यासाठी ‘गांधीदूत’ काँग्रेसच्या ‘जॉईन काँग्रेस सोशल मीडिया मिशन १० हजार’ ही मोहीम सुरु करण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेसच्या ‘जॉईन काँग्रेस सोशल मीडिया मिशन १० हजार’ या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून राजीव गांधीनी आधुनिक तंत्रज्ञान देशात आणले. त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत भाजप समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत असल्याचे सांगत काँग्रेसकडूनही त्यांना आता चोख उत्तर मिळणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपकडून समाजात खोटी माहिती पसरवली जात असल्याचे सांगत याला प्रतिबंध घालत प्रत्युत्तर देण्यासाठी आणि लोकांपर्यंत खरी माहिती पोहचविण्यासाठी ‘गांधीदूत’ ही सोशल मीडिया मोहीम एक वर्षापूर्वी प्रदेश काँग्रेसकडून सुरु करण्यात आली होती. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे पंधरा हजार लोकांनी नोंदणी केली होती त्यातील दहा हजार लोकांना काँग्रेसचे सोशल मीडिया पदाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना “जॉईन काँग्रेस सोशल मीडिया मिशन १०,०००” या मोहिमेत सहभागी करत भाजपने दिलेल्या खोट्या माहितीला समोर आणत खरी माहिती नागरिकांसमोर आणली जाणार असल्याची माहिती असं सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार दिली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया देत राजकारण करु नये, असे पटोले म्हणाले.

 

Protected Content