आमोदा येथे घनश्याम काशीराम विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील आमोदे येथील घनश्याम काशीराम विद्यालय आमोदे विद्यालयाच्या मैदाना वरती जिल्हा क्रीडा अधिकारीजळगाव पंचायत समिती यावल,घ.का. विद्यालय आमोदे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय योगदिन साजरा करण्यात आला, याप्रसंगी यावल तालुका गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके, यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला सुरुवातीस आमोदे शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष उमेश दादा पाटील,सचिव प्रा उमाकांत पाटील, चेअरमन ललित दादा महाजन, व्हा.चेअरमन एकनाथ लोखंडे,सरपंच जुगेरा लतिफ तडवी उपसरपंच मनिषा चौधरी योग शिक्षक तुकाराम सखाराम बावस्कर ग्रामविकास अधिकारी गौतम आधरवाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी यावल तालुका क्रीडा महासंघाचे अध्यक्ष व श्री दत्त हायस्कुल चिखली बु विद्यालयाचे मुख्याध्यापक के. यु. पाटील यांनी प्रास्ताविक करून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निरामय जीवन जगण्यासाठी योग व प्राणायाम याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले. योगशिक्षक तुकाराम बावस्कर यांनी विद्यार्थ्यांकडून योग व प्राणायाम करून घेत “करो योग, रहो निरोग” योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. योगासनांच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. वॉर्मिंगअप ने सुरुवात करून पद्मासन,ताडासन वृक्षासन, पर्वतासन,भुजंगासन,पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन,भद्रासन, वज्रासन, शशांकासन, मकरासन, शलभासन,अर्धहलासन,पवनमुक्तासन, शवासन अशी आसने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक घेतले. त्यात अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी प्राणायाम, ध्यान,शांतीपाठ घेतले. आजच्या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, यांनी योगा प्रत्यक्षिकात सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अतिशय उत्साहात हसत खेळत व आनंदमय वातावरणात योगा करण्यात आला तालुका क्रीडा समन्वयक दिलीप संगेले सर व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक एन सी पाटील यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आहाराचे व योगाचे महत्त्व सांगितले व मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मुख्याध्यापक संजीव बोठे म्हणाले आंतरराष्ट्रीय योग दिन हा २१ जून संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो .संपूर्ण मानवी जातीच्या उत्तम आरोग्यासाठी योगसाधना ही प्राचीन काळापासून तर आज पर्यंत केली जाते. आजच्या धकाधकीच्या जीवनापद्धतीत मानवी जीवनशैली सुधारण्यासाठी योग साधना अत्यंत महत्त्वाची व आवश्यक असल्याचे असे सागुन अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय एन चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन एन सी पाटील यांनी केले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content