प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे प्रदान

फैजपूर, ता. यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रहार जनशक्ती पक्षाच्या फैजपूर येथील पदाधिकार्‍यांना पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आलीत.

फैजपूर शहरासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनी नुकतीच नियुक्तीपत्रे प्रदान केली आहेत. यात आरिफ शेख यांची जळगाव जिल्हा संघटक या पदावर, माजी नगराध्यक्ष अब्दुल जलील यांची फैजपूर शहराध्यक्ष तर नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांची अनुसूचित जमाती मागासवर्गीय आघाडीच्या यावल तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात पक्षातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाचपणी करण्यात येत असतांना या नियुक्त्या महत्वाच्या मानल्या जात आहेत.

याप्रसंगी अनिल चौधरी यांनी नवीन पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करून सर्वसामान्यांची सेवा करण्याचे आवाहन केले. या वेळी प्रहार अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष मोहसीन शेख (कल्लू), विक्की काकडे, सचिन कोळी, रोशन सपकाळे आदी उपस्थित होते.

Protected Content