जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगांव येथे मेजर ध्यानचंद (हॉकी के जादूगर) यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, रजिस्टरार डॉ. ईश्वर जाधव, क्रीड़ा संचालक डॉ. आसिफ खान व महाविद्यालयाचे विद्यापीठ खेळाडु उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व क्रिडा दिनाचे महत्व विषद केले