कोपरगाव, विशेष प्रतिनिधी | तालुक्यातील कोकमठाण कोपरगाव येथील आत्मा मलिक ध्यानपीठ यांच्या सहकार्याने व योग फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित महाराष्ट्र योग असोसिएशन तर्फे नुकतीच राज्यस्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पंच डॉ. अनिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात परमानंद महाराज यांच्या उपस्थितीत व राष्ट्रीय कुस्तीपटू विनय नायकल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पंच डॉ.अनिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच ९ व्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशीप दक्षिण कोरिया येथील येसू या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तेथे त्या भारताकडून योग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पंच म्हणून गेल्या होत्या. त्या निमित्ताने महाराष्ट्र योग असोसिएशन व आत्मा मालिक ध्यानपीठ यांच्या वतीने शाल व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.