जळगाव, प्रतिनिधी । येथील बस आगारातून प्रवाशांची मागणी लक्षांत घेऊन उद्या सोमवार १४ सप्टेंबर पासून राज्यांतर्गत व आंतरराज्य बस सेवेस प्रारंभ होत असल्याचे आगार व्यवस्थापक यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना सांगितले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची राज्यांतर्गत व आंतरराज्य बस सेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊनच्या काळात बंद होती. आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने व प्रवाशांची मागणी लक्षांत घेतून जळगाव आगारातून बस सेवेस प्रारंभ झाला आहे. आता सोमवार १४ सप्टेंबरपासून आंतरराज्य बस सेवेस देखील प्रारंभ होत आहे. या बस फेऱ्या पुढील प्रमाणे असणार आहेत.
जळगाव ते वापी सकाळी ८ वाजता ,
वापी ते जळगाव सकाळी ७.४५ वाजता ,
जळगाव ते अंकलेश्वर सकाळी ८.३० वाजता,
अंकलेश्वर ते जळगाव सकाळी ७.३० वाजता,
जळगाव ते नाशिक सकाळी १० वाजता,
नाशिक ते जळगाव सकाळी ७ वाजता,
जळगाव ते मुंबई सकाळी ७.३० वाजता,
मुंबई ते जळगाव सकाळी ७.३० वाजता
तसेच शुक्रवार १८ सप्टेंबरपासून पुणेसाठी सीटर +स्लीपर बससेवा रात्री ८ वाजता सुरु होणार असल्याचे आगार व्यवस्थापक निलेश पाटील यांनी कळविले आहे.
शुक्रवार पासून सुरू होणाऱ्या स्लीपर प्लस सीटर या बसचे जळगाव ते पुणे भाडे ६७५ रुपये ठेवण्यात आलेले आहे. साध्या लाल परीचे रातराणीचे भाडे सहाशे रुपये आहे आणि दिवसाच्या बसचे भाडे पाचशे रुपये आहे. त्यामुळे स्लीपर प्लस सीटर या बसला उदंड प्रतिसाद लाभण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बसमध्ये बसण्यासाठी ३० सीट असतात तसेच झोपण्यासाठी १५ बर्थ असतात सर्वात आधी येणाऱ्या प्रवासाला त्याच्या पसंतीचे सीट मिळते.