Home क्राईम गाडी लावण्यावरून एकाला शिवीगाळ व दमदाटी

गाडी लावण्यावरून एकाला शिवीगाळ व दमदाटी

0
104


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दिक्षीतवाडी येथे ज्यूसची गाडी लावण्यावरून एकाला शिवीगाळ व दामदाटी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय घनशाम शर्मा (वय-५०) रा. दिक्षीत वाडी हे आपल्या कुटुंबियांसह वास्‍तव्याला आहे. त्यांच्या घरसमोर सैय्यद आसिफ सैय्यद शाहीद हा ज्यूस गाडी लावतात. दरम्यान, गुरूवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास संजय घनश्याम शर्मा यांनी घरसमोर गाडी लावून नको असे सैय्यद आसिफ याला सांगितले. याचा राग आल्याने सैय्यद आसिफ याने शिवीगाळ करून दमदाटी केली आणि तुझ्याकडून जे होईल ते करून घे असा दम दिला. याप्रकरणी संजय शर्मा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सैय्यद आसिफ सैय्यद शाहीद रा. दिक्षीतवाडी याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

 


Protected Content

Play sound