जळगाव प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्याचे वाईट वाटून तीन जणांनी दादावाडी येथील नगरसेवकाला अश्लिल शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या फिर्यादीनुसार, डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील (वय 34 रा. श्रीराम नगर दादावाडी) हे नगरसेवक म्हणून दादावाडी परिसरात निवडून आलेल्या आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी निलेश सुधाकर पाटील रा. खोटे नगर हे निवडणुकीत पराभूत झाले होते. याचा राग मनात कायम होतो. पराभव झाल्याच्या रागातून 18 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या घरासमोर येऊन निलेश पाटील यांच्यासह अन्य तीन जणांनी अश्लिल शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.