नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाकडे वळा – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नोकरी करण्यापेक्षा तरूण व विद्यार्थ्यांनी व्यवसायाकडे वळावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचन भवनात जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हारसेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना व सांस्कृतिक महासंघाच्यावतीने धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 

पालकमंत्री पुढे म्हणााले की, समाजाने केलेला सत्कार म्हणजे प्रोत्साहन असून  हा अविस्मरणीय असतो. गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे.  मोबाईलच्या क्षणिक सुखाला बळी न पडता मोबाईलचा वापर हा गरजेपुरता झाला पाहिजे. संत महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार आत्मसात करून युवकांनी उच्च शिक्षण घ्यावे व मोठे अधिकारी होऊन समाजाचा नावलौकिक करावा व समाजशील नागरिक बनावे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले

 

कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे तर प्रमुख अतिथी म्हणून आ.राजुमामा भोळे, महाराष्ट्र धनगर समाज मल्हारसेनेचे सरसेनापती बबनराव रानगे , छगन नागरे , जळगाव आर टी ओ श्याम लोही , सहाय्यक नियोजन अधिकारी राहुल इधे , मल्हारसेनेचे मा.सरसेनापती सुभाष सोनवणे , दुध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख , धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे , धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे , मल्हारसेनेचे सरचिटणीस संदिप तेले , दिवाणी न्यायाधीश रोहिणी मनोरे ,पहुरचे सरपंच रामेश्वर पाटील , रमेश सुलताने सर , जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणुन निवड झालेले सचिन पाटील , अहिल्या महिला संघाच्या प्रदेश सदस्या रेखा न्हाळदे , धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलिप धनगर , कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल , मल्हारसेना प्रमुख गजानन निळे , अहिल्या महिला संघ अध्यक्ष प्रमिला कंखरे , सांस्कृतिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश धनगर सर , गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके , शहराध्यक्ष मंदाकिनी पाचपोळ , जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर , रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयेश कुयटे , मा.शिक्षण सभापती सुरेश धनके , डाॅ.नरेंद्र शिरसाठ , रमेश सोनवणे , सोनवद सरपंच लताताई धनगर , बोरनार सरपंच सखुबाई धनगर , शोभा मोते ,  प्रशांत विरकर , अनिल मनोरे ,  हिलाल सोनवणे , अॅड.शरद न्हाळदे , अॅड.एस.आर.पाटील , हरीभाऊ हिवराळे , अरुण ठाकरे , रामचंद्र चर्‍हाटे , धर्मा सोनवणे , रामचंद्र निळे ,  डाॅ.संजय पाटील , सखाराम बनसोडे , डि.बी.पांढरे , संदिप सावळे आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनीभविष्यातही कष्ट, जिद्द व चिकाटी ठेऊन यश संपादन करा. समाज हितासाठी आपण काही देणं लागतो या भावनेने संस्कार जोपासत कार्य करावे असे आवाहन केले.

 

सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संदिप तेले यांनी आपल्या प्रास्ताविकातून समाजातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरली पाहिजे व समाज संघटनासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे , गणेश बागुल यांनी तर संतोष कचरे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या गुणवंतांचा झाला सत्कार !

यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर तसेच डिप्लोमा, स्कॉलरशिप, नीट जेईई व व अन्य स्पर्धात्मक परीक्षा मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचापालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी व बारावी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, संस्कार पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.प्रा.डाॅ.विजय शिरसाठ यांनी विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थांना हेडाम (कांदबरी) व सर्व विद्यार्थांना संघर्षमुर्ती अहिल्याई ही पुस्तिका भेट दिली.

 

कार्यक्रम यशस्वी तेसाठी यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळशिराम सोनवणे , रामचंद्र चर्‍हाटे , अरुण ठाकरे , सुनिल खोमणे , बापु पवार ,  यशवंत शिरोळे , डिगंबर सोनवणे , पांडुरंग पवार , विजय पवार , किशोर कंखरे , प्रविण पवार , मयुर ठाकरे , उमेश सुर्यवंशी , संदिप(पिंटु)मनोरे , मनोज बाविस्कर ,प्रविण पाचपोळ , निलेश न्हाळदे(फोटोग्राफर) परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी  यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समाज बांधवांनी, कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे उपस्थिती देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

Protected Content