मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | शेतकऱ्यांना मदत संभाजीनगरचे नामकरण, रस्ते, पाणी यावर ठोस उपाययोजनेऐवजी संभाजीनगर वासियांना केवळ आणि केवळ टोमणेच मिळाले असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा झाली यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अच्छे दिन कोठे आहेत म्हणत, अच्छे दिन आले का? कधी येणार? काहीच नाही. अशी भाजपाची थेर असल्याची मोदी सरकारसह भाजपावर खरमरीत टीका केली.
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या सभेला टोमणेसभा म्हणून निशाणा साधत, ठाकरे यांनी दुसऱ्यांना ‘अच्छे दिन’ सांगा, बांधावरची मदत दिल्याचे आठवत नाही, पेट्रोल-डिझेल दर स्वत: कमी करीत नाही, आणि म्हणे अच्छे दिन’ लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…, असे ट्वीट करत टीका केली.