चोपडा प्रतिनिधी । शहरातील गांधी चौकात उभारलेल्या ऐतिहासिक श्री रोकड बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त तिरुपती बालाजींच्या भव्य मूर्तीची स्थापना उद्या करण्यात येत असून १५ ते १८ ऑक्टोबर या चार दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या १५ ऑक्टोबर रोजी शोभायात्रेला दुपारी ४ वाजता श्री रोकड बालाजी मंदिरापासून सुरुवात होणार आहे. या शोभायात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होणाचे आवाहन विश्वस्त पंडित अशोक महाराज, पंडित अलोक महाराज यांनी केले आहे. दि.१६ ऑक्टोबर रोजी देवतास्थापना कार्यक्रम सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून जलधिवास, सायंआरतीसह यज्ञकर्माचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी दि. १८ ऑक्टेाबर रोजी श्री बालाजी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, पूर्णाहूती, महाआरती व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक येथील प्रधान आचार्य विद्यावाचस्पती हरिश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मवृंद प्रतिष्ठापनेचे पौराहित्य करणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या नेतृत्वाखाली विविध उपसमित्या कार्यरत असल्याची माहिती समितीप्रमुख घन:श्याम अग्रवाल यांनी दिली.
कार्यक्रमासाठी समित्यांचे गठण शोभायात्रा समिती :- संजय सोमाणी, पवन अग्रवाल, यशवंत चौधरी, अनिल अग्रवाल, संजय शर्मा, मनोज अग्रवाल, सागर बडगुजर, दीपक पाटील, शैलेश अग्रवाल, राजेंद्र स्वामी, सुरेश अग्रवाल.
मंदिर पूजा समिती :- पं. आलोक महाराज, मुन्ना अग्रवाल, बालाजी सैनी, मयंक अग्रवाल, किशोर सैनी.
स्वागत समिती :- नंदलाल अग्रवाल, महेश शर्मा, संजय शर्मा, मनोज अग्रवाल, सुनील अग्रवाल, नीलेश अग्रवाल.
मंडप व मंदिर सजावट समिती :- अजय अग्रवाल, अजय अग्रवाल, श्रीराम अग्रवाल, चंद्रकांत सोनार.
भजनी मंडळ :- चंदुलाल पालिवाल.
साऊंड सिस्टीम :- तिलेश शहा.
पूर्णाहूती व प्रसाद वितरण समिती :- आशीष अग्रवाल, पुनमचंद शर्मा, अविनाश राणे, प्रमोद अग्रवाल, मेनपालजी वर्मा.