वा रे पठ्ठया : बँक खात्यात चुकून आलेले ३८ लाख रूपये केले परत !

सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी | बँक खात्यात दुसर्‍या व्यक्तीने चुकून ३८ लाख रूपये आल्यावर ते तातडीने बँकच्या माध्यमातन संबंधीताला परत करण्याची घटना तालुक्यातील तांदलवाडी येथील बँकेत घडली असून याबाबत त्या तरूणाचे कौतुक करण्यात येत आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील थोरगव्हाण येथील रहिवासी प्रीतम अरविंद झोपे यांचे युनियन बँक ऑफ इंडियाच्या तांदलवाडी येथील शाखेत खाते आहे. काल म्हणजेच दिनांक २७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या बँक खात्यात ३८ लाख रूपये आल्याचा मॅसेज आल्याने त्यांना धक्का बसला. आपला काहीही संबंध नसतांना ही रक्कम चुकीमुळेच आपल्या खात्यामध्ये आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब वडिलांना सांगितली. त्यांच्या वडिलांनी याबाबतची माहिती युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना सांगितली.

या प्रकरणी बँकेने चौकशी केली असता हा प्रकार चुकीने झाला असल्याचे निष्पन्न झाले. यानुसार, आज ही रक्कम मूळ मालकांना परत करण्यात आली. या प्रकरणी प्रीतम झोपे यांनी तात्काळ दखल घेऊन मूळ मालकाला रक्कम परत केल्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Protected Content