जळगाव, प्रतिनिधी । कोरोना आजाराच्या जनजागृतीसाठी आणि वेळीच उपचार घ्यावे याकरीता गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बीएस्सी नर्सिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी शुक्रवार २१ मे रोजी जळगाव गाव खुर्द येथे पथनाट्य सादर करून कोरोनाबाबत माहिती देत त्याबाबतचे गैरसमज दूर करण्यात आले.
गोदावरी नर्सिग महाविद्यालयातील कम्युनिटी हेल्थ विभाग तसेच युथ रेड क्रॉसविंगच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव खुर्द येथे बीएस्सी नर्सिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी जाऊन ग्रामपंचायत परिसरात कोविड जनजागृतीबाबत पथनाट्य सादर केले. यात प्रा. रेबिका लोंढे, प्रा.निर्भय मोहोद, प्रा. प्रिया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी कोरोनाशी लढा कसा द्यायचा, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काय खावे आणि काय खावू नये. अत्यावश्यक असलेले लस कशी महत्वाची आणि ती कोठून मिळते, त्यासाठी नोंदणी कशी करावी लागते. लक्षणे दिसताच न घाबरता सर्वप्रथम अॅन्टीजेन, आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी आणि रिपोर्ट पॉझिटीव्ह असला तर तातडीने रुग्णालयात अॅडमिट होवून औषधोपचार घ्यावे असे आदी मार्गदर्शन करण्यात आले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/533987487979569