मुंबई प्रतिनिधी । कोविड-१९ नंतर म्युकर मायकॉसीसने धडकी भरवली असतांनाच आता व्हाईट फंगस म्हणजे पांढर्या बुरशीच्या संसर्गाचा धोका समोर आल्याने आरोग्य यंत्रणांसमोरील चिंता वाढली आहे.
कोविडचा उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकर मायकॉसीस या व्याधीचा प्रादूर्भाव होत असल्याचे समोर आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आता या रोगाचा राष्ट्रीय महामारी म्हणून समावेश होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याचा प्रतिकार करण्यासाठी सरकार सज्ज होत नाही तोच आता व्हाईट फंगस म्हणजेच पांढर्या बुरशीच्या संसर्गाची उदाहरणे समोर आली आहेत.
भारतातील अनेक राज्यांत काळ्या बुरशीच्या संसर्गाच्या घटना समोर आल्या आहेत. बिहारमधील पाटणा येथे व्हाईट फंगस संसर्गाची चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. काळ्या बुरशीच्या संसर्गापेक्षा पांढरे बुरशीचे संक्रमण जास्त धोकादायक आहे कारण यामुळे फुफ्फुसांवर तसेच शरीराच्या इतर भागावर नखे, त्वचा, पोट, मूत्रपिंड, मेंदू, खाजगी भाग आणि तोंडात परिणाम होतो. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये व्हाईट फंगसचे मोठे आव्हान उभे राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.