गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘इंडक्शन प्रोग्राम’

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात बी.बी.ए व बी.सी.ए मधील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रॅम घेतला गेला.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी केले. यात ते विद्यार्थ्यांना संबोधताना म्हणाले की, महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश करणे हा विद्यार्थ्यांच्या जीवनामधील आव्हानात्मक बदल असतो. विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाबद्दल भीती असते, काही विद्यार्थ्यांमध्ये लाजाळूपणा, काळजी असते आणि हीच भीती, लाजळूपणा, काळजी इत्यादी विद्यार्थ्यांच्या मनामधून काढून टाकून त्यांचे या उच्च शिक्षणात स्वागत करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबद्दल माहिती देणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे असा या खपर्वीलींळेप झीेसीरा चा हेतू आहे. विद्यार्थ्यांनी वाचन करणे, दररोज इंग्लिश वृत्तपत्र वाचण्यावर जास्त भर देणे गरजेचे आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्रा. चारुशीला चौधरी यांनी बी.बी.ए चा अभ्यासक्रम, परीक्षेची गुणप्रणाली, क्रेडिट पॉईंट्स इत्यादी विषयी माहिती दिली तर प्रा. मिताली शिंदे यांनी बी.सी.ए च्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमिका नाले व पारस सपकाळे यांनी केले. कार्यक्रमाचे कामकाज प्रा. चारुशीला चौधरी यांनी केले. यावेळी बी.बी.ए व बी.सी.ए च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या डॉ. नीलिमा वारके व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Protected Content