इंदोर-चोपडा बस झाडावर आदळली ; २१ जखमी,दोघांची प्रकृती गंभीर

chopda accident bas

चोपडा (प्रतिनिधी) इंदोर-चोपडा या बसला आज पहाटे अपघात झाला असून त्यात २१ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असून जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, ही घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास चोपडा शिरपूर रोडजवळील हॉटेल वसंत विहार येथे घडली.

 

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी रात्री रात्री ११ वाजता इंदूरहून चोपडाकडे निघालेली चोपडा आगाराची बस अचानक झाडावर आदळली. या अपघातात 21 प्रवासी जखमी झाले आहेत. इंदोर येथून सुटणारी बस क्रमांक एम एच 20 बी एल 2407चोपडा कडे येत असताना वेगात होती. चालकाचा ताबा सुटल्याने बस समोरच असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी चालकासह काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यात सुनंदा अरुण कोळी (४२) रा.गोरगावले,सुवर्णा विजय कोळी(२३)चोपडा, अनुभवी रसाळ(४२) चोपडा, भुरसिंग रामदास पाटील(७५)चोपडा,मंजुळा भुरसिंग पाटील(६२)चोपडा, ऋषीकुमार देवरे(५२)यावल,गुमान महादू पाटील(६५)तावसे,जगदीश विठ्ठल गवळी(४५)बीडगाव, चित्रकला कोळी चोपडा, वंश विजय कोळी दिड वर्ष रा.हुडको कॉलनी चोपडा, दिव्या लाड (७)एरंडोल, अविनाश लाड(१२)एरंडोल, दिलीप जगन्नाथ लोहार(५८)धरणगाव, सिंधुबाई गुमन पाटील(६५)तावसे,दीपक प्रकाश साळुंखे(२८)चोपडा, वर्षा लाड(३५)एरंडोल, विभा भरवड (७०)यावल,सुभाष गणपत पाटील(६३)लासुर, रतीलाल शामराव चौधरी(६५)चोपडा, शिरीष लाड (४१)एरंडोल, संजय पाटील(३५)चोपडा,यांचा समावेश आहे. यापैकी सुभाष गणपत पाटील,सिंधुबाई गुमन पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.दरम्यान, या अपघातात जखमीमध्ये दोन बालकांचा समावेश असल्याचे देखील कळते.

 

 

घटना घडल्यानंतर तत्काळ जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रवासी विभा विठ्ठल भरवाड(७०) रा.यावल यांच्या फिर्यादीवरुन बसचालक यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. किरकोळ जखमी असलेल्या काही प्रवाशांना एस. टी. विभागाच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली असून यावेळी दिलीप बंजारा (विभागीय वाहतूक अधिकारी),किशोर अहिरराव(आगार व्यवस्थापक चोपडा),निलेश बेंकुळे (सहहायक कार्यशाळा अधीक्षक),कृष्णा सोनवणे(वाहतूक निरीक्षक),अशोक बाविस्कर(वाहतूक नियंत्रक),देवांनाद पाटील(वाहतूक लिपिक)यांनी भेट देऊन जखमींना मदत केली. जखमींवर डॉ. वैद्यकीय अधीक्षक मनोज पाटील,डॉ. शरद पाटील,डॉ. गुरुप्रसाद वाघ,डॉ. नरेंद्र पाटील,डॉ. पंकज पाटील,कर्मचारी आर एस भालेराव, एम एन नाद्रे सोनकांबळे यांनी उपचार केले.

Add Comment

Protected Content