मातोश्रीवरील बैठकीत इंदिराताई पाटील यांचा सहभाग

indira patil chopda चोपडा प्रतिनिधी । राज्यातील शेतकरी शेतमजुर महिलांच्या प्रश्‍नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे आज बैठक आयोजित केली होती. यात चोपडा तालुक्यातील सौ. इंदिराताई पाटील यांचा समावेश होता.

विधानपरिषद उपसभापती ना. डॉ.नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात मराठवाडा विभागातील सखुबाई लटपटे- परभणी महिला जिल्हा संघटिका, संगीता चव्हाण- जिल्हा महिला संघटिका, बीड, रजिया शेख- जिल्हा उपसंघटिका, बीड, उज्जवला भोपळे- विधानसभा संघटिका, गेवराई जि बीड, सविता किवंडे, महिला जिल्हा संघटक, जालना, शामल वडणे- धाराशिव महिला जिल्हा संघटिका, उमादेवी रणदिवे – शहर संघटिका धाराशिव तर पश्‍चिम महाराष्ट्र येथून सुनीता मोरे– माजी महिला जिल्हा संघटिका, सांगली, उत्तर महाराष्ट्र विभागातून इंदिरा पाटील, महिला माजी जिल्हा संघटिका – जळगाव, कोकण विभागातून वैदही पाटील – पालघर यांच्यासह तालुका संघटिका उपस्थित होत्या.

Protected Content