भुसावळ, प्रतिनिधी | शहरात राहुल नगर जवळील आखाड्याच्या बाजूला एक इसम विना परवाना देशी व विदेशी दारूची विक्री करत होता त्याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून ३ हजार १०० रुपयांच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
भुसावळ शहरात राहुल नगर जवळील आखाड्याच्या बाजुला एक इसम त्याच्या कबज्यात गैर कायदा विना परवाना देशी व विदेशी दारुची विक्री करत असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने मा.पो.अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पो.अधिक्षक भागयश्री नवटके , उप.वि.पो.अधिकारी गजानन राठोड , पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भु.बा.पेठ.पो.स्टे चे पो.ना रविंद्र बि-हाडे, रमन सुरळकर पो.कॉ. कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, ईश्र्वर भालेराव, प्रशांत परदेशी अश्यांनी लागलीच तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव विलास शांताराम धनगर ( वय – ५० रा.गांधी चौक गाव – साकेगाव ता.भुसावळ) असे सांगितले. तसेच त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ २ हजार ६४० रुपये किमतीच्या ऑफिसर चॉईस कं.च्या २२ बाटल्या, ४६० रु.कि.च्या गोवा जीन कं.च्या. ६ बाटल्या असा एकुण ३ हजार १०० रुपये किमतीचा माल मिळुन आला. म्हणुन त्यावर भु.बा.पेठ.पो.स्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास पो.हे.कॉ मिलींद कंक करीत आहे.