इंदूर वृत्तसंस्था । भारतीय संघाने पहिल्या कसोटीत बांगलादेशचा धुव्वा उडवला आहे. भारताने या सामन्यात एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला. तसेच कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी विजय मिळवत भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडी मिळवली.
या कसोटीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव भारताने 150 धावांत गुंडाळला होता. मग भारताने पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित करुन, बांगलादेशवर 343 धावांची आघाडी घेतली. भारताच्या वेगवान माऱ्यासमोर बांगलादेशी फलंदाज तग धरु शकले नाहीत. बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने 4 विकेट घेतल्या. तर बांगलादेशकडून दुसऱ्या डावात मश्फिकूर रहीमने सर्वाधिक 64 धावा केल्या.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने आपला पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात भारताने तब्बल 343 धावांची आघाडी घेतली. कसोटीचा आज तिसरा दिवस होता. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला होता. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज पुन्हा बांगलादेशी फलंदाजांना लगाम घालून त्यांचा खेळ खल्लास करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं, ते भारतीय गोलंदाजांनी करुन दाखवलं.