रावेर येथील दोन्ही भावंडांचा नदीत बडून मृत्यू

raver news

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील पुनखेडा गावाजवळ असलेल्या भोकर नदीत घोड्याला धुण्यासाठी उतरलेल्या दोन्ही सख्ख्या भावंडाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज दुपरी 2 वाजेच्या सुमारास घडली. दोघांचा मृतदेह पाहतांच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता.

शहरातील माजीत खान यांचा रावेर रेल्वेस्टेशनवर घोडागाडीचा व्यवसाय आहे. त्यांना तीन मुले आहे. यातील आसिफ खान मजीत खान (वय-15) आणि समिर खान माजीत खान (वय-13) रा. रावेर हे दोन्ही शहरापासून 5 किलोमीटर अंतररावर असलेल्या भोकरी नदीवर घोडाटांगा घेवून घोड्याला धुण्यासाठी दुपारी 1 वाजता घरातून निघाले. दरम्यान दुपारी 2 वाजता भोकरी नदी घोडा धुत असतांना लहान भाऊ समिर पाण्यात उभा असतांना पाय घसरल्याने बुडत होता. हे पाहून मोठा भाऊ असिफने लहान भाऊला वाचविण्याचया प्रयत्न केला असता तो देखील पाण्यात बुडाला. यात दोघांचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता दोघांना मयत घोषीत केले.

Protected Content