नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इंडिया आघाडीला आता आणखी एक झटका बसला आहे. कारण नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वोसर्वा फारुख अब्दुल्ला यांनी एकला चलोचा नारा दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. यामुळं जसं जशी लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे, तशा देशातील राजकीय घडामोडी वाढायला लागल्या आहेत.
फारुख अब्दुल्ला म्हणाले, “मला माहितीए की जम्मू-काश्मीरमध्ये आता विधानसभा आणि लोकसभा निवडणूक सोबतच पार पडतील. त्यामुळं जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे तर मी हे स्पष्ट करु इच्छितो की, नॅशनल कॉन्फरन्स एकटीच निवडणूक लढेल आणि यात कुठलीही शंका नाही.
देशहितासाठी मला जे काही करावं लागेल ते मी करेन. त्याचबरोबर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या भेटीबाबत विचारलं असताना त्यांनी म्हटलं की, जर त्यांनी बोलावलं तर कोण चर्चेसाठी तयार नसेल”