भारतीय महिलांचा ५ धावांनी विंडीजवर दणदणीत विजय

indian teem women

मुंबई वृत्तसंस्था । भारत आणि विंडिज यांच्या माहिला क्रिकेट संघामध्ये झालेल्या टी-२० सलग चौथ्या सामन्यात भारताने विंडिजचा धुव्वा उडवला. विंडीज महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ ९ षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने ५० धावा केल्या तर या आव्हानाचा पाठलाग करत विंडीजने केवळ ४५ धावा केला आहे. त्यामुळे भारताला सामना जिंकणे सोपे गेले.

विंडीज महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ९ षटकात भरभर धावा जमवण्याच्या प्रयत्नात भारताने तब्बल ७ गडी गमावले. भारताच्या पूजा वस्त्रकारने सर्वाधिक १० धावांची खेळी केली. विंडीजच्या मॅथ्यूजने २ षटकात १३ धावा देत ३ बळी टिपले आणि भारताच्या डावावर अंकुश लावला. फ्लेचर आणि ग्रिमंड या दोघींनी तिला चांगली साथ देत २-२ बळी मिळवले. ५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांचाही गोंधळ उडाला. मॅथ्यूज (११), हेन्री (११) आणि मॅकलीन (१०) या तिघींना भारताच्या आव्हानाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सामना जिंकता आला नाही. शेवटच्या षटकात विंडीजला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुजा पाटीलने बळी घेतले. त्यामुळे भारताला सामना जिंकणे सोपे गेले.

Protected Content