भारतीय संघाने बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण व 2 रौप्यपदक जिंकले

E1

मुंबई प्रतिनिधी । इंडोनेशियातील लाबुऑनबाजो येथे झालेल्या अध्यक्षीय चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाने 7 सुवर्ण आणि 2 रौप्यपदकं पटकावले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावना गावच्या अनंताचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक आहे. महाराष्ट्राच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू व सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक गिरीश पवार याचे मार्गदर्शन लाभले. मागील वर्षी पुणे येथे आर्मी स्पोर्ट इंस्टिट्यूट येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अनंताने महाराष्ट्रासाठी रौप्यपदक जिंकले होते. रेल्वेत नोकरी करत असलेल्या अध्यक्षीय बॉक्सिंग स्पर्धेत 52 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानच्या रहमानी आर.चा 5-0 असा सहज पराभव केला. सहा विश्व अजिंक्यपद नावावर असलेल्या दिग्गज बॉक्सर मेरी कोमचे सुवर्ण या स्पर्धेतील चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्यासह सिमरनजित कौर, जमुना बोरो, मोनिका, अंकुश दाहिया, नीरज स्वामी, अंनता चोपडे यांनीही भारताला सुवर्णपदक पटकावून दिले. भारतीय संघाने या स्पर्धेत सर्वोत्तम संघाचा मानही मिळवला. बऱ्याच दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या अपेक्षित कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकले.

Protected Content