चोपड्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे दुसरे प्रवचन संपन्न

harinam

चोपडा प्रतिनिधी । येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्ताने फुलमाळी समाज सुधारणा पंच मंडळ तसेच सर्व समाज बांधवांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह सुरु असुन, आज दुस-या प्रवचनात, ‘आपले सर्व नाते तुटले, तरी चालेल परंतु भगवंताशी नाते तोडू नका’ प्रखळ विचार ह.भ.प. सविता महाजन यांनी मांडले आहे.

ते पुढे म्हणाले की, मुलांना इंग्रजी मीडियम शाळेत शिकवताना आध्यात्मिक ज्ञान दया, कोणत्याही वारकऱ्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात राहत नाही, संसाराच्या प्रपंचात आपण सर्वांना जवळ केले परंतु आपला चालक मालक भगवंतालाच दूर करुन त्यालाच विसरलो आहोत. मुलांवर संस्कार हे राजमाता जिजाऊ सारखे दया, माता जिजाऊने पोटातच संस्कार दिल्याने अवघ्या सोहळाव्या वर्षी शिवाजी महाराज राजे छत्रपती झाले. आपल्या माता गर्भवती राहतात तर त्यांना टीव्ही पाहणे सुचते, सिरीयलमध्ये एका माणसाने कमीतकमी 2 लग्न केले असतांना, मग कसे संस्कार चांगले होतील. म्हणून बाळ जन्माला आला की मोबाईल बघत असतो. मोबाईल, टीव्हीने मूल संस्कार हीन झाले आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच आध्यात्मिक ज्ञान दयायलाच हवे. ज्याला जो देव आवडेल तो माना परंतु त्या-त्या देवावर निष्ठा ठेऊन भक्ती करावी. तरच देव पावतो असे मत ह.भ.प. सविता महाराज यांनी केले आहे. यावेळी समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content