दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ घोषित

teem

नवी दिल्ली वृत्तसंस्था । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (दि.12 सप्टेंबर) रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, एक उत्तम संघ असून भारताला सलामीच्या जोडींची चिंता सतावत आहे. अंतिम संघातून लोकेश राहुलला वगळण्यात आल्याने सलामीला कोण येणार हा प्रश्न टीम इंडियासमोर उपस्थितीत होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २०१८ पासून आतापर्यंत भारताने कसोटी सामन्यांमध्ये सात फलंदाजांना आलटून-पालटून सलामीची संधी दिली आहे. केएल राहुल, मुरली विजय, शिखर धवन, पृथ्वी शॉ, पार्थिव पटेल, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी यांनी डावाची सुरुवात केली आहे. केएल राहुल याला सर्वाधिक १३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने २३ वेळा भारतीय डावाची सुरुवात केली आहे. त्याने सर्वाधिक ४९१ धावा केल्या आहेत. मात्र, धावांच्या सरासरीची तुलना करता तो चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, लोकेश राहुल हा सलामीवीर म्हणून अपयशी ठरला आहे. मागील १२ डावांमध्ये त्याला एकदाही ५० चा आकडा पार करता आला नाही. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या मालिकेतही सलामीवीर म्हणून त्याला फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं त्याला वगळण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्मा हा मयांक अग्रवाल सोबत सलामीला येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Protected Content