Home क्रीडा भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलला संधी

भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलला संधी

0
35

shubman gill
नवी दिल्ली वृत्तसंस्था । दक्षीण अफ्रिकेविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला असून यात के.एल. राहूलच्या जागी शुभमन गिल याला संधी देण्यात आली आहे.

शुभमन गिल याने प्रथमश्रेणी सामन्यांवर अतिशय चांगली कामगिरी केली आहे. यासोबत भारतीय अ संघाकडून खेळतांना त्याने दक्षीण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरूध्ददेखील चमकदार कामगिरी केल्याने याला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, सातत्याने अपयशी ठरलेल्या के.एल. राहूल याला अपेक्षेनुसार संघातून डच्चू देण्यात आलेला आहे. आज एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने जाहीर केलेला संघ दक्षीण आफ्रिकेविरूध्द तीन सामने खेळणार आहे.

असा आहे संघ : विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, रविचंद्रन आश्‍विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत व वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक).


Protected Content

Play sound