रफाह येथे यूएनमध्ये कार्यरत भारतीय लष्कर अधिकारी हल्ल्यात शहीद

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यूएनमध्ये दोन महिन्यापूर्वी सहभागी झालेले माजी कर्नल वैभव काळे हे १३ मे रोजी सोमवारी गाझामधील रफाह येथे शहीद झाले. त्यांचा इस्रायल व हमास हल्ल्यातील पहिला आंतरराष्ट्रीय बळी मानला जात आहे. ते एका कर्मचाऱ्यासह यूएन फ्लॅग असलेल्या अधिकृत वाहनातून रफाह येथील युरोपियन रुग्णालयात जात असताना झालेल्या हल्ल्यात ते ठार झाले. हमासविरुद्धच्या युद्धात इस्रायलने रफाहवर चढाई सुरू करीत भीषण बॉम्ब वर्षाव व गोळीबार सुरू आहे. तेथेच मागील महिन्यात १२ एप्रिलला वैभव काळे हे निरीक्षक म्हणून रुजू झाले.

मूळचे नागपूरचे असलेले वैभव काळे एनडीए व त्यानंतर आयएमएमार्फत लष्कराच्या पायदळात रुजू झाले. २२ वर्षांच्या सेवेनंतर २०२२ मध्ये त्यांनी लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते दोन वेगवेगळ्या खासगी कंपन्यांत उच्च पदावर सेवेत होते. मात्र त्या नोकऱ्या सोडून त्यांनी यूएनडीएसएसमध्ये सेवा सुरू केली. त्यांची गाझापट्टीत रफाह येथे पोस्टींग करण्यात आली होती.

Protected Content